‘आनंदाची गुरुकिल्ली’


Deprecated: implode(): Passing glue string after array is deprecated. Swap the parameters in /home/vlilwzgm/rejoicewellness.in/wp-content/themes/noo-medicus/functions_custom.php on line 285

सर्वांना आंतरराष्ट्रीय आनंद दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

आंतरराष्ट्रीय आनंद दिनाच्या निमित्ताने ‘आनंदाची गुरुकिल्ली’

आजकाल आपल्याला डिप्रेशन बद्दल खूप ऐकायला वाचायला मिळते. आजुबाजुला पाहीले तर सतत तक्रार करणारे, आयुष्याबद्दल दुःखी किंवा असंतुष्ट असणारे, सतत कंटाळलेले किंवा थकलेले अनेकजण दिसतात. आपल्याला स्वत:ला देखील कधीकधी असे काहीसे होते. पण कारण निटसे कळत नाही. मग धकाधकीचे जीवन, ऑफिसमधील दगदग, ट्रॅफीक अश्या कोणत्यातरी गोष्टीमध्ये आपण ते कारण शोधून घेतो. पण खंर सांगायचं तर आपल्या शरीरातील काही ठराविक हार्मोन्स आपले आनंदी असणे नियंत्रित करतात. जसे की एन्डॉर्फिन, डोपामाईन, सिरोटोनिन आणि ऑक्सिटोसिन. काही सोप्या गोष्टी करून आपण ह्या हार्मोन्सचा योग्य पुरवठा आणि स्तर मेंटेन करु शकतो.

एन्डॉर्फिन : 

1.      व्यायाम केल्याने शरीरात उत्तम प्रमाणात एन्डॉर्फिन निर्माण होते. 

एन्डॉर्फिनचा शरीरावरील प्रभाव २-३ तास मोठ्या प्रमाणावर आणि कमी प्रमाणात २४ तासापर्यंत राहतो. त्यामुळे नियमित व्यायामाला प्राधान्य द्या.

2.       कोका आणि तिखट पदार्थ जसे मिरची, हिरवी, लाल किंवा पिवळी भोपळी मिरची देखिल हे हार्मोन्स निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

3.      भरपूर मनमोकळेपणाने हसणे देखिल एन्डॉर्फिन निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरते.

डोपामाइन :

1.      कोणतेही ध्येय गाठणे,  लहान मोठे काम पुर्ण करणे ह्यामुळे आपल्या शरीरात डोपामाइन तयार होते. रोजचा दिनक्रम नीट पुर्ण करा.  लहान मोठे ध्येय गाठल्यावर स्वत:चे अभिनंदन करा.

2.      तसेच खाण्यापिण्यात काही बदल करुन आपण डोपामाइनचा स्तर वाढवू शकतो. जसे, साखर, अल्कोहोल,कॉफी, ड्रग्स टाळ.

3.      आहारात पुरेसे मॅगनेशियम घ्या. पालेभाज्या, फळे,  बदाम, आक्रोड, मोड आलेले कडधान्य, अंडी, मासे ह्या सर्व पदार्थात भरपूर मॅग्नेशियम असते.

4.      क आणि इ जिवनसत्व भरपूर प्रमाणात घ्या.

5.      नियमीत व्यायाम आणि पुरेशी झोप घ्या. 

सिरोटोनिन : 

1.      भरपूर सुर्यप्रकाश मिळाल्याने उत्तम सिरोटोनिन निर्माण होते. 

2.      नियमित व्यायामामुळे देखिल सिरोटोनिन स्त्रवण्यास मदत होते. 

3.      आहारात ‘ब’ जिवनसत्व, प्रथिने, पचनसंस्थेसाठी उत्तम असणारी धान्य, कर्बोदक ह्यांचा भरपूरसामावेश करावा. 

4.      इतरांना मदत करणे, समाजासाठी किंवा आसपासच्या लोकांसाठी काही कार्य करणे ह्यामुळे 

देखिल सिरोटोनिन निर्माण होण्यास मदत होते. 

ऑक्सिटोसिन :

1.      आपल्या जवळच्या व्यक्तीला स्पर्श करणे, मिठी मारणे किंवा आपल्या पार्टनर बरोबर शारिरीक संबंधह्यामुळे सर्वात जास्त ऑक्सिटोसिन निर्माण होते.

2.      भरपूर मनमोकळेपणाने हसणे देखिल ऑक्सिटोसिन निर्माण करते.

3.      तसेच आपण स्वत:चे किंवा इतरांनी आपले कौतुककरणे, तसेच आपण इतरांचे कौतुक करणे त्यांना प्रोत्साहित करणे,  इतरांना वेळ देणे, त्यांना गरज असेल तेव्हा मित्र म्हणून त्यांच्या व्यथाविवंचना ऐकून घेणे, ह्यामुळे ऑक्सिटोसिन निर्माण होण्यास मदत होते.

4.      नियमित व्यायाम, मेडिटेशन ह्यामुळे देखिल हे हार्मोन्स स्त्रवण्यास मदत होते.

आता दैनंदिन आयुष्यात  ह्या महत्वाच्या गोष्टी कराच ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.   

  1. नियमीत व्यायाम करा.
  2. लहान मोठी ध्येय गाठा.
  3. इतरांना मदत करा, सर्वांशी चांगले वागा.
  4. आपल्या माणसांना भेटून शेकहॅन्ड करा, मिठी मारा.
  5. भरपूर जिवनसत्व, प्रथिने असणारा चौरस, सकस आहार घ्या. आनंदी राहा.